Friday, 29 June 2018

तोरणा किल्ला-बोरट्याची नाळ-रायगड

वासोटा ट्रेक पूर्ण झाल्यावर प्रतीक्षेत असणारा तोरणा-बोराट्याची नाळ-रायगड ह्या रेंज ट्रेक चा विषय डोक्यात आला.मित्रासोबत ट्रेक संदर्भात बोलल्यावर काही मित्रांकडून नकार,काही कडून होकार,तर काही मित्र म्हणाले असा ट्रेक असतो का कुठे हा ट्रेक शक्य नाही अशी उत्तर मित्रांकडून मिळाली.
   शेवटी रोहित,पंकज, राम यांना ट्रेक साठी कुठे जायचे हे सांगितले नाही फक्त 3 ते 4 दिवसाचा ट्रेक आहे एवढेच सांगितले तिघे पण तयार झाले.शारीरिक आणि मानसीक कसोटी बघणारा हा ट्रेक होता त्यामुळे संपूर्ण माहिती आणि तयारी करणे गरजेचं होत.ऑफीस आणि वैयक्तिक कामामुळे माहिती काढण्यास वेळ लागत होता,
महिना भर ब्लॉग आणि गुगल महाराजांकडून माहिती मिळून नकाशा,रस्ते,परिसराची माहिती काढली.
         तोरणा किल्ला-भट्टी गाव-वरोटी गाव-मोहरी गाव-.                   बोरट्याची नाळ-रायगड वाडी-रायगड किल्ला

  सर्व माहितीची मित्राशी चर्चा करणे गरजेचे होते म्हणून सर्वाना फोन करून रात्री पंकज च्या घरा जवळ भेटायचे ठरवले,चौघा जण भेटल्यावर तिघांना उत्सुकता होती ती भटकंती च्या नावाची.जास्त विलंब न करता त्यांना, मी तयार केलेला प्लॅन त्यांच्या समोर ठेवला,तोरणा-रायगड हा ट्रेक समजताच तिघांच्या हावभावातून आणि उत्साह बघून योग्य ट्रेक असल्याची जाणीव मला झाली.तिघांनी सुद्धा हा रेंज ट्रेक प्लॅन बगून जाम खुश झाले,आणि ट्रेक may 2018 ला उन्हाळा कमी होताच जाण्याचे ठरवले,वडील हवामान खात्यात असल्यामुळे त्यांनी दिलेल्या माहितीचा पुरेपूर उपयोग झाला आणि 25 मे 2018 ला जायचे ठरलं पण मान्सून बदला मुळे 21 ला जायचे ठरले,तशी सर्व तयारी सुरु झाली जेवणाची जवाबदारी रोहित साहेबानी स्वीकारली,बाकीच सामान मी आणि रोहित दोघांनी सोबत जाऊन आणले तशी बऱ्यापैकी पूर्ण तयारी झाली होती,आता आम्ही वाट बघत होतो ती 21 मे 2018 ची,पण अचानक एका क्षणी गणितच बदलली,पंकज ला काही कारणा मुळे येण्यास जमणार न्हवते,आणि आमचे राम साहेब पंकज ला जमत नसल्यामुळे त्यांनी सुद्धा येण्यास नकार दिला,आता राहिला तो रोहित त्याला सुद्धा कळवलं झालेल्या गोष्टी बद्दल ,तरी सुद्धा आम्ही दोघांनी भेटायचे ठरवले तळजाई बस स्टॉप वर,ट्रेक अवघड असल्यामुळे अजून कोणी मित्र येतायत का ते प्रयत्न करत होतो आम्ही दोघांनी मोबाईल मध्ये जेवढे कॉन्टॅक्ट नंबर होते तेवढे सगळ्यांना परत फोन केले पण कुणी येण्यास तयार झाले नाही पण रोहित च्या जिद्दीमुळे आम्ही हा ट्रेक दोघांनी करायचं ठरवलं ,पण रात्री राम साहेबांचा फोन आला आणि त्यांनी येण्याची तयारी दर्शवली व सोबत अक्षय हा नवा सोबती येत असल्याचे सांगितले.ट्रेक ला जायचा दिवस उजाडला पंकज चा फोन आला त्याला भेटायचे होते म्हणून राम च्या घराजवळ बोलावले तिथं गेल्यावर समजले अक्षय चा रात्री अपघात झाला, रात्री तीन हत्ती चौकात टेम्पो ने धडक दिली कारण चौकातील सोडा गाड्यानी केलेल्या अतिक्रमणा मुळे रस्ता रुंद झालामुळे, नशीब बलवत्तर असल्यामुळे काही मोठा प्रसंग ओढवला नाही किरकोळ मध्ये भागले एवढं होऊन सुद्धा ह्या पठ्ठ्याने येण्याची तयारी दर्शवली मानलं मित्रा तुला दुसरं कुणी असत तर लांबूनच राम राम केला असता , थोड्यावेळात पंकज सुद्धा पोहचला त्याच्या महत्वाच्या कामामुळे त्याला येण्यास जमणार न्हवते पण त्याने सुद्धा तो प्रश्न मार्गी लावत येण्यास तयार झाला.आता आम्ही 5 जण ट्रेक साठी तयार झालो दुपारी 4 वाजता निघायचे ठरले पण पण ट्रेक चा नियमच आहे कोणी वेळेत निघताच नाही,त्यामुळे निघायला थोडा वेळ झाला सर्व मित्र भारती विद्यापिठ ला निगण्यासाठी जमलो आम्हाला तोरणा किल्ल्या जवळ सोडण्यासाठी माउली,रोहित आणि विनायक सोबतीला होते आणि आमची प्रवासाला सुरवात झाली रात्री 8.30 ला आम्ही स्टार्टींग पॉईंट ला पोहाचलो.सोडायला आलेल्या मित्र मंडळींचा निरोप घेतला आणि घेतलेल्या सामानाची सर्वांच्या बॅगेच्या क्षमते नुसार कमी जास्त वाटप केले.


   मंगलमूर्ती आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या घोषणेने या रेंज ट्रेक ची सुरवात झाली.
अर्धा चंद्र आणि सुसाट वारा यांच्या सोबतीने आमचा नाईट ट्रेक सुरु झाला,रात्री उशिरापर्यंत आम्ही तोरणा किल्ल्यावर पोहचलो

कोठी दरवाज्या मधी सेल्फी काढून मेंगाई मंदिरात रात्री मुक्कामी थांबलो,घरून आणलेल्या जेवणामुळे आजतरी रात्री चूल पेटवायची गरज न्हवती,रात्री जेऊन सगळ्यांनी मंदिरातच आराम केला,पहाटे कुणी तरी दरवाजा वाजवत आहे असं वाटलं ,वाऱ्या मूळे दाराची कडी वाजत असलं अस वाटून परत झोपलो पण तरी जोरात दरवाज्यावर कुणी आदळल्या सारखे वाटले आणि वेगळाच ओरडण्याचा आवाज येऊ लागला उठून बाहेर गेलो तर मंदिराच्या भोवती माकडे जमा झालती,जसा बाहेर आलो तशी सारी माकड पसार झाली(आपल्या बॅग,बूट इ. वस्तू रात्री मंदिरा बाहेर ठेऊ नये माकडांचा घोळका खाण्यासाठी वस्तु घेऊन जातात),सर्व जण उठून प्रातः विधी आटपून पुढच्या प्रवासाला तयार झाले.

सकाळी देव दर्शन घेऊन,दक्षिणेकडे असलेल्या वालांजाई दरवाजा कडे कूच केली , पुढे स्वागतासाठी निसर्ग तयार होता 


ढगांच्या गर्दीतून रास्ता काढत आमचा प्रवास सुरु होतो,सकाळची वेळ असल्या मुळे सगळी मंडळी ताजी तवाणी होती,चालण्याचा कुणालाच कंटाळा येत न्हवता कारण सोबत होती ती नयन रम्य निसर्गाची
पुढे वालांजाई दरवाजा आपल्या उजवीकडे कडे कड्याच्या खाली असल्यामुळे सहज दिसून येत नाही पण पंकज भाऊंच्या नजरेतून कुठली गोष्ट सुटली तर ठीक वालांजाई दरवाज्या मधी आम्ही पोहचलो,



वेळ सकाळची असल्या मुळे सगळ्यांना चहा पिण्याची इच्छा झाली मग काय दरवाज्याच्या बाजूला दगडी रचून चूल तयार रोहित भाऊंनी कडक चहा केला त्या चहा समोर कर्वे रोडच्या कॅफे पॅराडाईज, गरवारे ब्रिज जवळील कॅफे गुडलक, कॅम्प मधील इराणी चहा फिका होता .
     चहा ला अमृत का म्हणतात ? याची जाणीव आशा वेळी प्रकर्षाने होते.
वालांजाई दरवाज्या मध्ये मित्रानं सोबत चहा चा आस्वाद घेण्याचा पुन्हा आयुष्यात कधी प्रसंग येईल का? असा मनाशीच प्रश्न पडला आणि समोर असलेल्या निसर्गामध्ये हरवून गेलो.
वालांजाई दरवाजा मधून आपल्याला भट्टी गाव सहज नजरेस पडते,वरून आंतर बघून सहज आपण तासात पोहचू हा अंदाज आमचा चुकला,कारण वेडी वाकडी वळण आदी मधी जीव मुठीत आणणारे सरळ सुळके आपली वाट बगत आहेत 


वालांजाई देवीचे दर्शन घेऊन आम्ही भट्टी गावात उतरायला सुरुवात झाली,रस्ता अवघड असल्यामुळे आणि जेवणाचे सामान भरपूर असल्याने आमचा वेग कमी होता,भट्टी गावात उतरतानी रोहित पुढे पुढे जात गायब झाला,आम्ही बाकीचे त्याला शोधायला डोंगरांमध्ये भटकतोय पण तो काही मिळेना काही जणांना तर वाटले रोहित दरीत पडून गेला अश्या नको त्या कल्पना डोक्यात घर करू लागल्या,शेवटी गावात पोहचलो अक्षय ला पुढे मंदिरात जाऊन बघायला सांगितले,तो पुढे जाऊन निरोप घेऊन आला की रोहित मंदिराजवळ आराम करतोय तेव्हा कुठे सगळ्यांच्या जीवात जीव आला,पुढे त्याला जाऊन बघितले तर हा बाबूजी गावातल्या नेते मंडळी सोबत गप्पा हाणत बसलाय,ह्याला शोधण्यात किमान तास भर वाया गेला,पुढे विलंब न करता गावातून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या भरून पुढच्या प्रवासाला लागलो,गावात चौकशी केल्यावर समजले की जर वरोटी मार्गे गेल्यास 5 ते 6 किमी अंतर वाचते,त्यामुळे आजचा मुक्काम वरोटी गावात करायचे ठरले,वरोटी गाव भट्टी पासून अंदाजे 7 किमी होते,
               दुपारी मॅगी चा बेत करून पुढच्या प्रवासाला सुरवात झाली सकाळ पासून चालत असल्यामुळे सगळ्यांचे पाय उत्तर द्यायला सुरुवात झाली होती , पण राम भाऊंकडे सामानाचे पोते होते,गडी ते घेऊन एकटा काही कुर कुर न करता सकाळ पासून चालत होता मानल भाऊ तुला इथं आमचे पाय उचलना आणि ह्यो वज घेऊन नॉन स्टॉप सुटलाय,आम्ही दिवे लागणीच्या वेळेस वरोटी गावात पोहचलो तिथे पोहचल्या वर गावकरी मंडळींनी आमची विचारपूस केली काही जेवणाची सोय करू इच्छित,पण आम्ही सगळ्यांचे आभार मानून चूल पेटवली रोहित भाऊंनी आज डाळ भात करायचा बेत केला होता,रोहित त्याच्या कामाला लागला बाकीचे मंडळी आपल्या घरी फोन करत होती,गावात फक्त BSNL ला रेंज होती ती पण माळरानात एक किमी जाऊन मोबाईल हातात घेऊन टॉवर सारखा हात वर करून बोलायला लागत होते,तोवर रोहित साहेबानी मस्त डाळ भात बनवला होता सगळ्यांनी लोनच्या सोबत डाळ भात पुसून खाल्ला,चव असली जबरदस्त होती असा डाळ भात मी आयुष्यात पहिल्यांदाच खात होतो रोहित भाऊंच्या मेहनतीचे चीज झाले.
सकाळी लवकर उठून पुढच्या प्रवासाला आम्ही सुरवात केली रस्ता जंगलातून वाकडा तीकडा आणि पाय वाट नसल्या मुळे आम्ही गावातून वाटाड्या सोबतीला घेऊन प्रवास सुरु केला



आज आम्हाला मोहरी गाठून रायलिंग पठारावर मुक्काम करायचा बेत होता त्या प्रमाणे आम्ही मोहरी गावाकडे प्रस्थान केले,आम्हाला वाटसरू ने मुख्य पाय वाटे पर्यंत सोडून पुढच्या रस्त्याचे मार्गदर्शन करून निरोप घेतला,डोंगर चढ उतार करून मोहरी गावाच्या मुख्य रस्ताला आम्ही पोहचलो पुढचं दृश्य बगून सगळ्यांची मरगळ थकवा एका क्षणात नाहीस झाला कारण समोर होता गडांचा राजा आणि लिंगाणा
रायगड आणि लिंगाणा

मोहरी गावाचा रस्ता खूप कंटाळवाणी होता
कंटाळवाणी चाल काही केल्या संपत न्हवती,रस्त्यात भेटलेल्या गावकारीना विचारल्यास मोहरीला पोहचायला अजून किती वेळ?त्यावर तुम्ही हळू चाललाय त्यामुळे येळ लागतोय असे उत्तर मिळाले,दोन दिवसा पासून चालतोय अजून जोरात चालायचे त्राण होते कुणा लेकाच्यात?येईल तेव्हा येईल असा विचार करून आम्ही चालत राहिलो एकदाचे आम्ही मोहरी गावात पोहचलो तिथे जेवण केले आणि बोरट्याची नाळ उतरण्याचा निर्णय घेतला दुपारचे 2 वाजले होते,गावकर्यां जवळ रस्त्या बद्दल माहिती घेताना ते म्हणाले सिंगापूर नाळेनि जावा बोरट्याची नाळ अवघड आहे खूप, असे म्हणल्यावर पोरांच्या अंगात बळ आले अवघड आहे तर मग बोरट्याच्या नालेणीच जायचे असा एक मत ठराव वीणा चर्चा मंजूर झाला


आणि थोडा वेळ आराम केला,फक्त दोन पोरांनी आराम नाही केला ते तुम्हाला फोटो बगून समजेलच त्यात काही वाद नाही,आराम झाल्यावर रायलिंग पठारावरून लिंगणाचे दर्शन घेतले


लिंगाणा पहावा तर रायलिंग पाठरावरूनच.
लिंगाणा तर जणू पातळातुन आकाश फाडत गेला आहे.
लिंगाणा किल्ला हा शिव काळात रायगडाचे कारागृह म्हणून प्रसिद्ध होते,येथे कैदी ठेवत असत ,काय बिशाद त्याची की तो पळून जाईल,पडला तर थेट पाताळातच .
रायलिंग पठार म्हणजे सह्याद्रीची सीमा.
लिंगण्याच्या मागून रायगड बोलवत होता,मुक्कामी पोहचतो लवकरच असे सांगून आम्ही पाठराकडून माघारी निघलो ते बोरट्याच्या नाळेकडे.रायलिंग पठाराच्या अलीकडे 10 मिनिटाच्या अंतरावर  बोरट्याच्या नाळेत जायला रस्ता आहे




बोरट्याची नाळ म्हणजे अथांग दगडांचा सागर ,रस्ता असा नाहीच समजावा,आपल्याला जिथून सोपे वाटेल तिथून उतरावा,या वेळेस पण पंकज पुढं जाऊन आम्हा सगळ्यांना उतरायला मदत करत होता,मोहरी गावातली गावकरी का बजावून सांगत होती याचा साक्षात्कार आता होयला लागला होता,बोरट्याची नाळ आणि लिंगाणा माचीची नाळ संपता संपता न्हवती.

बोरट्याच्या नाळेतून बाहेर पडण्यासाठी 40 ते 50 फूट नंतर उजवी कडे कातळ भिंतीला क्लाइंबिंग चा बोल्ट लावला आहे तिथून कातळ पार करून जावे शक्य असल्यास 15 ते 20 फूट चा रोप जवळ ठेवावा.(कसलेल्या फिरणाऱ्या ला रोपाची शक्यतो गरज नसते)
  बोरट्याच्या नाळेतून बाहेर आल्यावर आपण लिंगाणा किल्ला च्या पायथ्याला आणि रायलिंग च्या पठाराच्याया मध्ये असलेल्या दरी मध्ये पोहचतो.

    इथून पुढे लिंगाणा नाळ सुरू होते,खरी सुरवात तर इथेच होते लिंगाणा नाळेतून उतरायला आपल्याला रस्ताच सापडत नाही अक्षरशः ही नाळ झोपून काही ठिकाणी उतरावी लागते पंकज लीड करत असल्यामुळे आम्हाला जास्त अवघड नाही गेलं.
तासा दीड तासांनी आपल्याला या नाळेतून बाहेर पडण्यासाठी मध्य भागी झाड दिसताच डावी कडून पायवाटेने आत शिरून पुढे जायचे आहे
लिंगाणा नाळेतून बाहेर पडण्याचा मार्ग.

बोरट्याची नाळ प्रथमच उतरत असाल तर शक्यतो सकाळी 11 च्या आत उतरायला सुरुवात करावी,आणि दुपार नंतर उतरुच नये.
नाळेतून आमचा पुढचा थांबा होता पाने गावात,नाळेतून पुढे आल्यावर लिंगणामाची गाव लागते पण आता या गावात कुणीच रहात नाही पूर्ण गावावर दरड कोसळण्याच्या भीती होती, मालिन गावाच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून लिंगणामाची गाव पाने गावात सरकारने स्थलांतरित केले आहे,डोंगर उतरताना पाय भरून आले होते,दोन पावलांच्या मधून मुंगी सुद्धा जाऊ शकत न्हवती अशी आमची चाल होती,तरी सुद्धा आम्ही आधी मधी न थांबता रात्री 8 वाजता पाने गावात पोहचलो.
 रात्री आम्ही पाने गावात पोहचल्यावर प्रथम जे दत्ताचे मंदिर लागते तिथे आसरा घेतला,चूल पेटवली सगळे दमले असल्या मुळे आज भात किंवा मॅगी न बनवता फक्त सूप चा बेत होता,रोहित भाऊंनी नेहमी सारखी पटकन चूल पेटून सूप अर्ध्या तासात बनवले , आज पोर खूप दमल्या मूळे पंकज आणि अक्षय सूप न पिताच झोपून गेले,उरलो आम्ही तिघांनी मस्त पैकी 2 ग्लास भरून सूप पिलें, मग कुठे जाऊन पोटाला आराम मिळाला.


पहाटे लवकर उठून आम्ही रायगड वाडी कडे कूच केली,रायगड वाडी 14 किमी च्या अंतरावर होती,त्यासाठी चा रस्ता आम्ही पकडला,पाने गावच्या वेशीवर राम मंदिर लागते
मंदिर आणि लिंगाणा किल्ला एकाच फ्रेम मधे

भाविकांचा देव मंदिरात आणि आपला देव डोंगरात असे वाटू लागले.
पाने गाव सोडल्या नंतर आम्ही 2 तासात धरणा जवळ पोहचलो आज तिसरा दिवस कुणी आंघोळी न्हवत्या केल्या मग काय पोर कपडे काडून पाण्यात , जस काय महिना भर आंघोळ न केल्या गत सारी तुटून पडली, सगळ्यांचा पाण्यात नुसता राडा चालू होता

मनसोक्त पाण्यात भिजून झाल्यावर सर्वांनी पटकन आवरले,आणि पुढच्या प्रवासाला लागले आता नॉन स्टॉप रायगड वाडी गाठायची होती,रायगड वाडीत आम्ही दुपारी पोहचलो,मग पुढे काय आमचा शेवटचा टप्पा बाकी होता
पुढे आम्ही चीत दरवाजा गाठला सगळ्यांनी दरवाजाला नमन करून रायगड चढायला सुरुवात केली आता सगळ्यांचा उत्साह बगण्या सारखा होता ती मरगळ कंटाळ कुठे तरी हरवून गेला होता
2 ते 2.30 तासात आम्ही रायगडावर पोहचलो
    महत्वाची बाब म्हणजे आमच्या सोबत तोरणा पायथा पासून ते रायगड पायथा पर्यंत आमच्या सोबतीला एक कुत्री होती , तिची या ट्रेक मध्ये खूप महत्त्वाची भूमिका न सांगता तिनी बजावली ,रात्रीच्या वेळेस आम्ही झोपल्यावर आमचे रक्षण तसेच रात्री ट्रेक करताना अंधारातिल वाटा शोधणे अशी महत्वाची कामे न सांगता तिनी बजावले.
     आम्ही रायगडावर पोहचल्यावर आम्हाला सर्वात प्रथम घाई होती ती समाधी च्या दर्शनाची कारण हा सगळा खटाटोप फक्त एका दर्शना साठी



ठरवल्या प्रमाणे मोहीम पूर्ण करण्याचे बळ दिल्या बद्दल साष्टांग नमस्कार.
समाधीच्या जागेवरून मागे लिंगाणा अंधुक दिसत होता आणि तोरणा तर दिसत न्हवता याचाच अर्थ की आम्ही खूप लांब चा पल्ला पार केला होता याचा आम्हा सर्वांना खूप आनंद होता.
आम्हा सर्वांच्या बोलण्यात करूनच दाखवले ची भावना होती.या ट्रेक मधून आमचे आणि निसर्गा मधील नाते अजून घट्ट झाले,समाधी जवळ निसर्ग सौंदर्य बघत असताना काही वाचनातल्या ओळी आठवल्या,
डोंगरयात्रेच भूत जर तुमच्या मानगुटीवर बसलं तर मगआपलं आयुष्य यातच रममाण होऊन गेल म्हणून समजा,एक वेळ विक्रम च्या खांद्यावरल्या वेताळला तिथे बसायचा वैताग येईल पण...... हा वेतळही कधी वैतागणार नाही आणि विक्रम तर वेताळच्या प्रेमातच ठार झालेला असेल.

इथंच वाकल्या झुकल्या त्या गर्विष्ठ माना !!
महाराष्ट्राचे भाग्य इथेच घडले,आमचा राजा इथेच महाराजा झाला,इथे वाजलेल्या प्रत्येक नौबती,उडालेल्या प्रत्येक तोफा,घुमलेल्या प्रत्येक घोषणामुळे....दिल्ली ला हादरावले.
इथेच आमची भूमी राजश्रिया विराजित सकल सौभाग्य संपन्न झाली.